राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षांपेक्षा जास्तीचा काळ लोटला गेला आहे. या सरकारवर भाजप नेते नेहमी टीका करताना दिसून येतात, तसेच हे सरकार लवकरच पडेल असे सांगताना दिसून येतात. पण असे असतानाच काही पक्ष ठाकरे सरकारसोबत युतीसाठी हात पुढे करताना दिसून येत आहे.

एमआयएमने ठाकरे सरकारकडे युतीसाठी हात मिळवणीचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेशी युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी या युतीबाबत वक्तव्य केले आहे.

आम्ही शिवसेनेशी युती करायला तयार आहोत. मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकदा भेटायला बोलावलं होतं. मात्र त्यांची काही हिंमत झाली नाही, मला काही बोलण्याची नाहीतर युती झाली असती. त्याच बरोबर आम्ही काँग्रेस समोरही प्रस्ताव मांडला आहे. मात्र त्यांनी ठरवावं की युती करायची किंवा नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  सोलापूर भूषण पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना ‘पुणे रत्न कार्यवैभव पुरस्कार’ राहीबाई पोपरे यांना जाहीर

तसेच हे शब्द चांगले नाहीते. पण बोलावं लागतंय. आम्ही लग्नाला तयार आहोत. मात्र शिवसेना आणि काँग्रेसला आमच्यासोबत फक्त फिरायचं आहे. त्यांना आमच्यासोबत लग्न करायचं नाही, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

शिवसेनेशी आमचे संबंध अजूनही चांगले आहेत. त्यांच्यासोबतचे संबंध अजूनही तुटलेले नाही. भाजपशी संबंध तुटलेले आहे. भाजपसोबत युती शक्य नाही. पण शिवसेनेशी युती होऊ शकते. आता त्यांनी ठरवायचं की, युती करायची की नाही, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

तसेच याआधीही मी प्रस्ताव दिले आहेत. हा काही नवीन प्रस्ताव नाही. शिवसेनेची वाट बघतोय काँग्रेसचीही वाट बघतोय. पण ते फक्त म्हणतात फिरा आमच्याबरोबर. आम्ही एकमेकांची रिस्पेक्ट करतो. बाळासाहेब ठाकरेंशीही आमचे चांगले संबंध होते, पण ते या गोष्टी फक्त दोस्ती पुरत्याच मर्यादीत ठेवत आहे, ते लग्नच करायला तयार नाही, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.