मुंबई : पहिली भेट, पहिला क्रश, पहिलं प्रेम आणि अर्थात मनात ठसलेली पहिली व्यक्ती आलियाच्या आयुष्यात एका वेळी कायमच्या घर करून गेल्या. या सर्व व्यक्ती म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व असणारा तिचा पती, अभिनेता रणबीर कपूर. प्यार दोस्ती है… असं त्यांच्या नात्याविषयी बोलणं गैर ठरणार नाही.

कारण मैत्रीपासन सुरु झालेलं हे नातं आज सहजीवनाच्या वळणावर आलं आहे. मुंबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी लग्नगाठ बांधली आहे.

काही दिवसांपूर्वी एकाएकी या सेलिब्रिटी जोडीच्या लग्नाची माहिती समोर आली आणि एकाएकी लगबग, घाई गडबजडीचं चित्र पाहायला मिळालं.

अधिक वाचा  DAVOS मध्ये महाराष्ट्राची कामगिरी सरस; राज्याचे 80 हजार कोटींचे करार

दोघांचीही कुटुंब आणि मित्रपरिवार यावेळी त्यांना साध देताना आणि मोठा आधार देताना दिसला. सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा स्वीकारत आलिया आणि रणबीर आता मिस्टर आणि मिसेस कपूर, म्हणून ओळखले जातील.