राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, “सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र आहे. १५ वर्षांत पुन्हा अखंड भारत तयार होईल. हे सगळं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहणार आहात. तसे पाहिले तर संत आणि ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे २०-२५ वर्षांत भारत पुन्हा अखंड होणारच आहे. जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन गती वाढवली तर १०-१५ वर्षांतच अखंड भारत निर्माण होईल”, असे मत मोहन भागवतांनी मांडलेले आहे.

कनखलच्या सन्यास रोडवरील श्रीकृष्ण निवास अर्थात पूर्णानंद आश्रमामधील ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री १००८ स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्री गुरुत्रय मंदिराचे लोकार्पण मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भागवत म्हणाले, “भारत वेगाने प्रगती करत आहे. त्यामध्ये जो कोणी आडवा येईल तो संपला जाईल. आम्ही अंहिसेचे विचार सांगणार; पण ते हातात काठी घेऊन सांगणार. आमच्या मनात कोणता द्वेष नाही. शत्रूत्व नाही. पण, जगच हिंसेच्या शक्तीला मानते, त्याला आम्ही काय करणार?”

अधिक वाचा  केतकी चितळेचा पाय खोलात! न्यायालयाने सुनावली 14 दिवसांची न्याालयीन कोठडी

मोहन भागवत म्हणाले की, “आमची राष्ट्रीयता गंगेप्रमाणे वाहते आहे. जोपर्यंत राष्ट्र आहे, तोपर्यंत धर्म आहे. धर्मांच्या उत्थानासाठी प्रयत्न होतील, त्यातून भारताचे उत्थान होईल. १ हजार वर्षे सनातन धर्म संपविण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण, तो संपला नाही. तो आजही आहे. भारत असा एकमेव देश आहे, जिथं जगातला कोणताही व्यक्ती आला तर त्याच्यातील दृष्ट प्रवृती नष्ट होते. ही व्यक्ती भारतात आली की, सुधारते आणि नंतर मिटते. तथाकथित लोक सनातन धर्माला विरोध करतात, त्यांचाही यामध्ये सहभाग आहे. त्यांनी विरोध केला नाही तर हिंदू जागृतच होत नाही.