मुंबई : घरमालकाला स्वत:चा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे, हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचे असेल तर त्यासाठी सोसायटीची परवानगी कशासाठी? घरमालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली.

आव्हाड यांच्या घोषणेमुळे आता फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीच्या परवानगीची प्रथा मोडीत निघणार आहे. एखाद्या घरमालकाने त्याची थकबाकी बाकी नाही, हे एनओसी पत्र काढून घ्यावे, असेही आव्हाड म्हणाले.

अधिक वाचा  दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक,वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास