गोठणे : कोल्हापुरात गोठणेजवळ असणाऱ्या सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चक्क एका घोरपडीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. विनापरवाना शस्त्रासह व्याघ्रप्रकल्पात घुसल्यानंतर अटकेची कारवाई केली असता हा प्रकार समोर आला. आरोपींचे मोबाइल तपासण्यात आले असता हे विकृत कृत्य उघडकीस आलं.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा.

चा भाग असलेल्या चांदोली राष्ट्रीय उद्यानातातील चांदोली वनपरीक्षेत्रातील गोठणे नियतक्षेत्रात शिकार कऱण्याच्या उद्धेशाने हे आरोपी शिरले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं संदीप तुकाराम, मंगेश पवार, जनार्दन कामटेकर आणि अक्षय सुनील आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपींचे मोबाईल तपासले असता ही घटना समोर आली आहे. मोबाइलमध्ये आरोपी घोरपडीवर सामूहिक बलात्कार करत असल्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आलं होतं.

अधिक वाचा  नवनीत राणा यांचा उल्लेख `अमरावतीची भाकरवडी`,दिपाली भोसलेंनी नवनीत राणांना डिवचलं!

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. सीसीटीव्हीत हे आरोपी जंगलात फिरताना दिसत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी कोकणातून कोल्हापुरच्या चांदोली गावात शिकारीसाठी आले होते.

आरोपींवर कोणत्या कलमाखाली कारवाई करायची याबद्दल सध्या अधिकारी चर्चा करत आहेत. दोषी आढळल्यास, आरोपींना सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. आरोपींना कोर्टात हजर केलं असता वन कोठडी सुनावण्यात आली आहे.