पुणे – केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण केंद्र हे बावधन येथे होणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठविला आहे.

हे प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रासह इतर चार राज्यांना उपयुक्त ठरणार आहे. या केंद्रामध्ये निवडणूकविषयक कामांची माहिती देणे, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण, त्यांच्या निवासाची व्यवस्था असणार आहे.

काही महिन्यांपूर्वी निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात येऊन बावधन, ताथवडे आणि वाघोली येथील जागांची पाहणी केली. या केंद्रासाठी सुमारे 2 एकर जागेची आवश्‍यकता आहे. बावधन येथील जागेस निवडणूक आयोगास पसंती दिली.

लोकसभा व विधानसभा निवडणुकींसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे हे सोयीचे ठरणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण हे प्रामुख्याने “यशदा’ येथे होत असत. आता मात्र निवडणूक आयोगाला हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. या केंद्रामध्ये सभागृह, ग्रंथालये, असणार आहेत.

अधिक वाचा  अतिरिक्त ऊस गाळप, कारखान्यांना १०४ कोटींचे अनुदान; महाविकास आघाडीचा निर्णय!

पुणे येथील हे प्रशिक्षण केंद्र विमानतळ, रेल्वे आदींच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांमधील अधिकारी त्याचबरोबर बाहेरील राज्यांमधील अधिकाऱ्यांनासुही हे केंद्र सोयीचे असणार आहे. त्यामुळे पुणे येथेच हे केंद्र व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.