पुणे : हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील पुणे मेट्रो लाईन ३ चे काम वेगाने प्रगतीपथावर असून या मार्गावरील पहिल्या खांबाच्या कास्टींग कामाचा शुभारंभ गणेशखिंड रस्त्यावर ई स्क्वेअर येथे आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आला. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पीएमआरडीए अधीक्षक अभियंता रिनाज पठाण, पुणे महानगरपालिका अधीक्षक अभियंता (पाणीपुरवठा) अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता (रस्ते प्रकल्प) व्ही. जी. कुलकर्णी तसेच मेट्रो कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सुमारे २३.३ किमी लांबीचा हा मेट्रो मार्ग पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड, टाटा प्रोजेक्ट्स आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  राज्यसभेची सहावी जागा चुरशीची : काँग्रेस-राष्ट्रवादीतील आयात नेत्यांना भाजपकडून संधी?