मुंबई : प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. जालना जिल्ह्यातील परतूर येथे रात्री 10 च्या सुमारास इंदोरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातात त्यांच्या ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली असल्याची माहिती आहे.

जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून इंदोरीकर महाराज किर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या स्कार्पिओ गाडीची लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. यात चालक किरकोळ जखमी झाला. या अपघातात इंदोरीकर महाराजांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा  पुणेकरांनो सावधान: वायफाय आणि केबलचे काम असल्याचे सांगून एण्ट्री करायचा तरूण आणि...

माहितीनुसार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या चारचाकी वाहनाला परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर किरकोळ अपघात झाल्याची घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. तालुक्यातील खांडवीवाडी येथे कीर्तनासाठी जात असतांना साईनाथ कॉर्नरवरील हॉटेल मधूबन समोर रस्ता क्रॉस करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर आदळून हा अपघात झाला.

एमएच 12 टीवाय 1744 या क्रमांकाच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने ते प्रवास करत होते. या अपघात इंदोरीकर महाराजांना कोणतीही इजा झाली नसून गाडीचा चालक संजय गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. अपघात स्थळावरून इंदोरीकर महाराज यांना दुसऱ्या वाहनाने खांडवीवाडी येथे पोचवण्यात आले. या ठिकाणी त्यांचे किर्तन नियोजित वेळेत पार पडले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शहरातील नागिरकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

अधिक वाचा  केतकी चितळेचीही महाराष्ट्रवारी?; १२ वा गुन्हा दाखल: Post वर ठाम असल्याचे न्याालयास सांगितले

अपघाताची माहिती मिळताच, परतुरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचारी शाम पांढरपोटे,नरेंद्र चव्हाण, दीपक खरात घटनास्थळावर दाखल झाले. जखमी चालकाला पोलिसांच्या मदतीने शहरातील अस्थिरोग तज्ञ डॉ.सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे.