मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर झालेला पुर्वनियोजित कट असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे. त्याचे पुरावेही पोलिसांनी सादर केले असून त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. या गुन्ह्यातील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यात हल्ल्याच्या दिवशी झालेले संभाषणही पोलिसांच्या हाती लागले आहे. हल्ल्याचा संपूर्ण प्लॅनच पोलिसांनी न्यायालयात मांडला आहे.

पोलिसांनी बुधवारी या प्रकरणातील मुख्य आरोपी गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. त्यासाठी पोलिसांनी अभिषेक व संदीप यांच्यातील संभाषणाची ओडिओ क्लीप, गुणरत्ने यांच्या घराच्या टेरेसवर झालेल्या बैठकीची माहिती आदी पुरावेही न्यायालयात सादर केले. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. गुणरत्ने यांनी अभिषेक व संदीप यांच्या माध्यमातून ही कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

अधिक वाचा  ज्ञानवापी मशिदीसंदर्भात अहवाल सादर होण्यासाठी आणखी 2-3 दिवस लागण्याची शक्यता

याप्रकरणात नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या (NCP) काही नेत्यांकडून केला जात आहे. त्यातच आता पोलिसांनी आंदोलनाशी संबंधित नागपूरमधील ‘त्या’ व्यक्तीचा छडा लावल्याची माहिती समोर येत आहे. पत्रकार चंद्रकांत सुर्यंवशीच्या तपासात रात्री ११ ते पहाटे २:५० पर्यंत सदावर्तेंच्या इमारतीच्या टेरेसवर जयश्री पाटील, नागपूरची व्यक्ती, आणि इतरांची बैठक झाली. या बैठकीत जयश्री पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले, त्याही आरोपी असून सध्या फरार आहेत. ८ एप्रिल रोजी सदावर्तेंनी नागपूरच्या व्यक्तीला फोन केला होता. त्यावेळी ती व्यक्ती मुंबईतच होती. आंदोलन नागपूरची व्यक्ती हाताळत होती, अशी माहिती पोलिसांच्या वतीने न्यायालयात दिली आहे.

अधिक वाचा  अंदमानात पावसाचं लवकरच आगमन, 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यात मोबाईलवरून झालेले संभाषण –

अभिषेक – हॅलो

संदीप – बोल अभिषेक

अभिषेक – तिथेच जाऊ का ?

संदीप – हा तिथेच जायचे

अभिषेक – आम्ही त्या बंगल्याच्या इथे चपला सोडल्या, आम्ही लवकर अगोदर आलो, आम्ही फोटो पण काढलेत, तिथे आता लय लोक आलेत, काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब, करावं तर सगळं आपणचं करावं, बाकिचे निवांत बसावं, इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं, मुदलियार पाटील आतच आलेत. आता रात्रभर मैदानात आलेत, सकाळी ९ पर्यत अंगोळ करून पण येऊ नये का ?

अधिक वाचा  धारावी गँगरेप प्रकरण; दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी केली अटक

संदीप – आता कुठे आहेत तुम्ही कुठे आहात आता

अभिषेक – हा इथे सगळ्या महिला घेतल्यात, डायरेक्ट त्यांना तिकिटांना पैसे दिलेत. तिकिट काढलेत निघालेत सगळे, ७० ते ८० महिला आणि माणसं आहेत १०० ते २००

संदिप – महालक्ष्मी पेट्रोलपंप कुठे आहे विचारा

अभिषेक – पेट्रोलपंपवर ना मिडिया आली

संदिप – मिडिया आली आहे

अभिषेक – चला मिडिया आली भाऊ

संदीप – हो