मुळशी : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) महाराष्ट्र,पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,पुणे द्वारा व पंचायत समिती मुळशी आयोजित स्टार्स प्रकल्प अंतर्गत इयत्ता पहिलीला दाखलपात्र विद्यार्थ्यांचा ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ जि.प.प.प्राथ.शाळा जवळ येथे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झाला. पहिलीला दाखल पात्र विद्यार्थ्यांना शाळेची व शैक्षणिक वातावरणाची आवड निर्माण व्हावी, त्यांची शाळेविषयीची भीती दूर व्हावी व त्यांना हसत खेळत व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शाळेचे सहशिक्षक किशोर बेलदार यांनी यावेळी दिली. याप्रसंगी केंद्रप्रमुख श्रीमती साधना भोई, जवळ ग्रामपंचायत सरपंच श्री.संतोषजी जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री.जालिंदर चौधरी, रसाळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली बारवे, सहशिक्षिका सौ.प्रतिक्षा नाईक, ग्रामपंचायत सदस्या सौ. योगीताताई घारे, सौ.वैशालीताई सुपेकर, शा.व्य.समिती उपाध्यक्ष सौ.मिनाक्षीताई घारे, रसाळवाडी अध्यक्षा सौ. पल्लवीताई तुपे, सदस्या दिपाली शिळवणे, माजी अध्यक्ष संदीप घारे, सदस्य नाना घारे, अंगणवाडी कार्यकर्त्या ताई शोभाताई घारे, राजश्रीताई घारे. नानासाहेब घारे, अश्विनी घारे, सारीका घारे, निशा घारे, उपस्थित होते.

अधिक वाचा  महाराष्ट्र हादरणार! ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र भाजपची उद्धव ठाकरेंनाही घेरण्याचे संकेत

कोरोना महामारीमुळे जवळपास दिड वर्ष विद्यार्थी शाळेपासून लांब होते. ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत नव्हते. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता १ लीला दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा ‘शाळापुर्व तयारी मेळावा’ अत्यंत महत्त्वाचा आहे. शाळेत दाखल होणाऱ्या या बालकांना शाळेविषयी व शिक्षणाविषयी गोडी लागावी,त्याचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी अतिशय उत्साहात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक जालिंदर चौधरी यांनी दिली.

या मेळाव्यात बालकांचा शारीरिक विकास,बौद्धिक विकास,भावनात्मक व सामाजिक विकास,गणन क्रियेचा विकास, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन इत्यादी घटकांचा व त्याच्या परिचयातील विविध वस्तूंचा वापर सहजरित्या तो करतो का ? याबाबत चा आढावा व पडताळणी घेण्यात आली. अतिशय दर्जेदार व आकर्षक शाळा सजावट, विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आकर्षक व आवडीचे शैक्षणिक साहित्य, बोलका शालेय परिसर या आजच्या मेळाव्याचे वैशिष्ट्य होते. केंद्रप्रमुख भोई मॅडम यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले.एकूणच हा ‘शाळापूर्व तयारी मेळावा’ उत्साहात पार पडला