मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी)मलिक यांची संपत्ती जप्त केली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

माहितीनुसार, ईडीकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता बहुतांश मुंबईतील आहे. यामध्ये कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, उस्मानाबादमधील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा, कुर्ला पश्चिमेतील तीन फ्लॅट्सकुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड,वांद्रे पश्चिमेतील दोन फ्लॅट्स उस्मानाबादमधील 148 एकर जमीन या मलिक यांच्या मालमत्तांचा समावेश आहे.

अधिक वाचा  दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती, नाहीतर...

नुकतेच ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी नवाब मलिक यांचा संबंध असल्याचं ईडीला तपासात आढळलं आहे, त्यानुसार ईडीने कारवाई करत नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती.

नवाब मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत असून आज त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ईडीने आपली केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत ईडीनं नोंदवलेला गुन्हा आणि पीएममएलए न्यायालयाच्या आदशेला हायकोर्टात नवाब मलिक यांनी आव्हान दिलं होतं.

तसेच आपली तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका केली होती. आपल्या विरोधात निव्वळ राजकीय सूड उगविण्यासाठीच केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचे देखील त्यांनी याचिकेत म्हंटलं होतं. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्यावर ईडी करत असलेला तपास पुढे कोणतं वळण घेईल पहावं लागेल.