मुंबई : ‘झी गौरव’ हे नाट्य आणि सिनेक्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्री यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी गेली २१ वर्षे झी गौरव पुरस्कारांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत आहेत. याच एका कार्यक्रम सोहळ्या दरम्यान विनोदी अभिनेते जॉनी लिवर यांनी त्यांच्या लहानपणीचा पेन विकत असताना त्य‍ांच्या आयुष्याला कलाटणी देणारा किस्सा स्टँडअप स्वरूपात मांडला.

जॉनी लिवर यांच्या लहानपणी घरची परिस्थिती हालाखीची होती.त्यामुळे त्यांना काम करावे लागत होते. हा किस्सा घडला तेव्हा जॉनी लिवर अवघे पंधरा वर्षांचे होते. “तेव्हा मी षण्मुखानंद सभागृहाच्या परिसरात बॉल पेन विकत असे. मला त्यावेळी मिमीक्री थोडीफार येत असायची, एकदा पेन विकले जात नाहीत म्हणून मी सहजचं मिमीक्री करुन पेन विकु असं ठरवलं आणि मी मिमीक्रीचे कसब वापरून लोकांना आकर्षित करु लागलो होतो.

अधिक वाचा  सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो, पोस्ट, पुण्यात ४ महिन्यांत दीड हजार तक्रारी दाखल

असेच एका वेळी मी अशोक कुमार, शत्रुघ्न सिन्हा, ओम प्रकाश यांच्या आवाजाची नक्कल करत विनोदी ढंगात पेन विकत होतो. आणि त्याच दरम्यान अचानक मुन्सिपाल्टीवाल्यांनी येऊन माझे सर्व सामान गाडीत भरले. आणि मला बजावले की इथे काय नकला करतोयस पाठीमागे षण्मुखानंद सभागृह आहे तिकडे जाऊन नकला कर.

मी त्यांची ही गोष्ट मनावर घेतली. आणि अवघ्या पुढील ३वर्षात त्याचे हे बोल मी खरे करून दाखवले. माझा पहिला शो षण्मुखानंद सभागृहात झाला.” असे जॉनी लिवर यांनी स‍ांगितले. हा किस्सा ऐकल्यानंतर उपस्थित सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या.

अधिक वाचा  अनुप डांगेंचा आणखी एक लेटर बॉम्ब

बॉलपेन विकता विकता चित्रपट सृष्टीला लाभलेल्या या महान अवलियाच्या ह्या प्रेरणादायी कहानीने उपस्थितांना अचंबित करुन सोडले. एका मुन्सिपाल्टीवाल्याने सांगितलेल्या या छोट्याश्या गोष्टीने जॉनी लिवर यांचे आयुष्य बदलून टाकले आणि हा विनोदी अवलिया कलाकार आपल्या चित्रपट सृष्टीला लाभला हे आपले भाग्यचं.

“मी मिमीक्री करायचो, कारण त्यावेळी अस गाणं वगैरे नव्हतं.” असं ते म्हणाले आणि तेवढ्यातच निलेश साबळे यांनी कच्चा बदाम या सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणार्या गाण्याचे उदाहरण दिले. यावर लगेच जॉनी लिवर यांनी आपल्या विनोदी शैलीमध्ये कच्चा बदाम या गाण्याची नक्कल देखील केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकचं हशा उठला.

अधिक वाचा  बॉबी देओलच्या संपूर्ण करिअर ची वाट लाऊन टाकली होती या अभिनेत्रीने,नाव जाणून तुम्ही अवाक् व्हाल

‘ झी गौरव’ या पुरस्कार सोहळ्या निमित्त सचिन पिळगांवकर, श्रेयस तळपदे, प्रसाद ओक, विजू माने, कुशल बद्रिके, नागराज मंजुळे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, यांसह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी यांनी केले.