मुंबई :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक चर्चांना उधणा आलं आहे. या हल्ल्यासाठी राज्याच्या गृहमंत्रालयाच्या कामावरही संशय घेतला जात आहे. दरम्यान, वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विश्वास नांगरे-पाटील यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली नसल्याचा आरोप केला आहे. कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी ज्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवायला हवा त्याच अधिकाऱ्यांवर चौकशीची जबाबदारी कशी दिली गेली, असा सवालही आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

यावेळी ते म्हणाले, शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची माहिती पोलिसांना होती, तरीही पोलिसांनी का कारवाई केली नाही. हे सर्व जाणीवपूर्वक झालं आहे का? याचीही चौकशी करावी, असेही त्यांनी सुचवले आहे. पुढे ते म्हणाले, पक्षाअंतर्गत आणि मित्रपक्षातही कुरघोडी होताना दिसत आहे. ही कुरघोडी खालच्या पातळीवर गेली असून व्यक्तीची सुरक्षा धोक्यात आल्याची परिस्थिती आहे. या हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी आणि चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

अधिक वाचा  अयोध्येतला ट्रॅप, व्हाया राणा ते अफजल खानाची कबर... राज ठाकरेंच्या भाषणाचे हे मुद्दे

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील घरावली एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक हल्ला केला. या आंदोलनादरम्यान त्यांच्या घरावर दगडफेक आणि चिखलफेक करण्यात आली. दरम्यान, यावर राष्ट्रवादीती नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या. पवारांच्या घरावरील हल्ल्याची रितसर चौकशी सुरु आहे. माहिती मिळेल तशी संबंधितांवर कारवाई सुरु आहे. कायद्याप्रमाणे पोलिस योग्य ती कारवाई करतील असे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केल आहे. आता प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे गृहखातं कोणती भूमिक घेणार हे पाहवे लागणार आहे.