मंगळवारी ठाण्यातील ‘उत्तर’ सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राज्यात जातीयवाद बोकाळला, या वक्तव्याचा राज यांनी पुनरुच्चार केला.

‘शरद पवार आपल्या भाषणात नेहमी शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचे सांगत असतात, ते कुणीही नाकारू शकत नाही. परंतु, शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना दिसत नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या आधी हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “शरद पवार नास्तिक, देव मानत नाहीत, देवळात हात जोडतानाचा फोटो सापडणार नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी शरद पवार जोरदार हल्लाबोल केला. “मुसलमानांची मते मिळणार नाहीत, या भीतीने पवार छत्रपतींचे नाव घेत नाहीत,” अशी टीका त्यांनी केली.

अधिक वाचा  elecation Breaking : ..... तिथं निवडणुका घ्या! मराठवाडा, विदर्भाचा मार्ग मोकळा?

यावर आता राष्ट्रवादीची प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत राज ठाकरेंवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. “जहिर सभा”, “उत्तर सभा” आता वाट “पुरवणी सभेची”, असं खोचक शब्दात ट्विट मिटकरी यांनी केले आहे.

ट्विटमध्ये मिटकरी म्हणतात, “”जाहिर सभा”, “उत्तर सभा” आता वाट “पुरवणी सभेची”… सभेत फक्त आणि फक्त मनोरंजन आणि प्रश्नच प्रश्न… वाऱ्याला लाथा मारणारी पुरवणी सभा झालीच पाहिजे. प्रश्न राष्ट्रवादीचे उत्तर BJP च्या C टीमचे” असं मिटकरी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत सुप्रिया सुळे यांच्यावर सडकून टीका केली. ‘सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे असा घणाघात राज ठाकरे यांनी केला. अजित पवार यांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी पडत नाही, याचं कारण मला कळेल का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.