मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मंगळवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या उत्तरसभेत मनसैनिकांना संबोधित केलं होतं.

या भाषणापूर्वी व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी राज ठाकरे  यांना तलवार भेट देण्यात आली होती.

राज ठाकरे यांनीही ही तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावली होती. याच कारणावरून आता राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलीये.

अधिक वाचा  काँग्रेसनेत्यांच्या नातेवाईकांसाठी धोक्याची घंटा; पक्षाची बांधणीसाठी काम केले तरच तिकीट!