नांदेड – बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर अज्ञात मारेकऱ्यांनी दिवसाढवळ्या अंधाधुंद गोळीबार करत हत्या केली. आता या प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.संजय बियाणी यांच्या घरी एक निनावी पत्र सापडल्याची माहिती मिळतेय. निनावी पत्रात बियाणी यांच्या हत्येसंदर्भात माहिती देण्यात आली.बियाणी यांच्या हत्येचा कट परभणीत बनला आणि त्यामागे एका वाळू माफियाचा हात आहे, अशी धक्कादायक माहिती या पत्रातून समोर आली आहे.

हे पत्र हिंदीमध्ये लिहिण्यात आलंय. हिंदी भाषेतून पाठवण्यात आलेल्या या पत्रात लिहलंय की, बियाणी साब को ठोकनेका मनसुबा परभणी में हुआ, जिसमे आनंद नगर से बहुत बडा दादा पांडुरंग येवले परभणी मे आया था. जिसने पहले गोरठेकर के बच्चे को मारा था, जो आताळा का रेती माफिया है, अभी भी डरसे कोई ऊसे बात नही करते. जिसेने परभणी से आणे का मनसुबा करा, मकसद था, बिल्डर के काम मे कोई नही रहेना, असं या पत्रात सांगण्यात आलंय.

अधिक वाचा  तर त्या दिवशी सर्वांचाच बीपी... केतकी चितळेच पवारांविरोधातील पोस्ट प्रकरणानंतर पहिल्यांदाच भाष्य

संजय बियाणी हे नांदेडमधील मोठे बिल्डर होते. त्यांच्यावर खंडणीच्या वसुलीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बियाणी घराबाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.