मुंबई – ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं.

शरद पवार हे स्वत: नास्तिक आहेत. ते धर्म, देव मानत नाहीत. या पद्धतीनेच ते राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी जातीवाद भडकवतो आणि भूमिका बदलतो, यावर पवारांनी बोलावे का?, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता.

राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेला राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी थेट शरद पवारांचा मंदिरामधील फोटो ट्विट करत उत्तर दिलं आहे.

अधिक वाचा  राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, ट्विट करत दिली माहिती

आजोबा होऊनही पोरकटपणा करणाऱ्या राज ठाकरेंनी आजपर्यंत जेवढ्या सभा घेतल्या नाहीत त्यापेक्षा कैकपटींनी जास्त मंदीरांना सभामंडप देण्याचे व तीर्थस्थळांचा विकास करण्याचे काम पवारसाहेबांनी केले आहे. फरक एवढाच की श्रद्धेचा बाजार भरवून धर्माच्या नावाने पवारसाहेब मतांचा जोगवा मागत नाहीत

दरम्यान, शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.

शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचं काय करायचं, असा सवाल त्यांनी केला आहे.