मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून शरद पोंक्षे ओळखले जातात. उत्तम अभिनय शैलीमुळे त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचा उल्लेख केला आहे.

राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तर सभा घेतली. या सभेतून त्यांनी चौफेर टोलेबाजी केली. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत, शरद पवार यांच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलने समाचार घेतला. त्यांच्या या भाषणानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अधिक वाचा  तेल लावलेल्या पैलवानाची गुडघ्यात अक्कल असलेल्या पैलवानासोबत युती, मनसेची शरद पवारांवर टिका

शरद पोक्षे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा देखील उल्लेख केला आहे. “आजचं राजसाहेबांचं भाषण हे बाळासाहेबांची आठवण करून देणारं. बऱ्याच काळान धारदार भाषण. हिंदूंची प्रखर बाजू मांडणारं भाषण. धन्यवाद राजसाहेब,” अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.

सध्या सोशल मीडियावर शरद पोक्षेंची ही पोस्ट चर्चेत आहे. अनेकांनी या पोस्टवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी त्यांच्या या वक्तव्याला संमती दर्शवली आहे.