मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांच्या तोंडाला कुणाचा भोंगा बांधलेला आहे. यांचा भोंगा जनताच बंद करेल. ईडीकडून अभय मिळाल्यानंतर राज ठाकरेंचा भोंगा वाजतोय असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलं.

काल, मंगळवारी ठाणे येथे झालेल्या एका जाहीर सभेत राज ठाकरे यांनी राज्यात मशिदीवरील भोगें ३ मेपर्यंत काढण्याचे राज्य सरकारला आव्हान दिले होते. शिवाय संजय राऊत यांच्या नकला काढत टीका केली होती. यावर राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं.

अधिक वाचा  शिखर धवनला त्याच्या वडिलांनी बदडले, प्लेऑफमध्ये न पोहोचल्याने नाराज

राऊत म्हणाले, ‘राज्य सरकारला कोणी अल्टिमेटम देत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिला होता. ती ताकद आणि कुवत बाळासाहेबांमध्येच होती. हा जो भोंगा वाजतोय, हा भाजपचा भोंगा आहे. निराशेतून हे भोंगे वाजत आहेत. भाजपने भोंगे वाजवले परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून, आता भाजपने नवे भोंगे लावले. त्याचाही उपयोग होणार नाही’ असंही राऊत म्हणाले.