महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवाच्या सभेमध्ये हिंदुत्वाचा प्रखर उल्लेख करत धुवाधार भाषण केले त्यामुळे उठलेल्या राजकीय धुळ्याला शांत करण्यासाठी आज ठाण्याच्या सभेमध्ये हिंदुत्वाच्या आग्रही भूमिकेमध्ये राज ठाकरे अक्षरश: मुसळधार पावसाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर बरसले आणि राष्ट्रवादीच्या चिंधड्या उडवत सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या सर्व टीकेचा खरपूस समाचार घेत आपली हिंदूत्ववादी भूमिका आजही कायम असल्याची जाणीव करून दिली.

महाराष्ट्रभर हिंदू-मुस्लिम द्वेष निर्माण केल्याची झालर आजच्या सभेला असताना राज ठाकरे यांनी या राज्य पातळीवरच्या मशिदीवरील भोग्यांच्या विषयाला राष्ट्रीय स्वरूप निर्माण करत भारतीय जनता पक्षाचे गुणगाण गात राष्ट्रवादीच्या दुटप्पी भूमिकेवर जोरधार हल्ला केला.

राज साहेब ठाकरे यांच्या आजच्या भाषणातील काही निवडक मुद्दे

महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे. शरद पवार कोणत्याही सभेत छत्रपती शिवाजींचे नाव घेत नाही. ते काय शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेतात. शरद पवार हे नास्तिक आहेत. शिवरायांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातील, अशी भीती शरद पवारांना आहे. घराघरात शिवाजी महाराजांना पोहचवण्याचे काम बाबासाहेब पुरंदरेने केले आहे. बाबासाहेब पुरंदरे हे पवारांसाठी सॉफ्ट टार्गेट आहेत. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे.

अधिक वाचा  लडाखमध्ये भीषण रस्ता अपघातात भारतीय लष्कराचे ७ जवान शहीद, अनेक जखमी

निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात येत आहे : राज ठाकरे

मराठा आरक्षणासाठी लाखोंचे मोर्चे निघाले. पण त्याचं पुढे झालं काय असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राजकरणासाठी वापरण्यात आला. आता निवडणुकींसाठी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापवण्यात येत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

अजित पवारांना ‘लाव रे तो व्हिडीओ’ तून उत्तर

मशिदीच्या भोंग्यावर मी या आधी देखील बोललो आहे. पण त्याचा झाले असे, सकाळच्या शपथविधीनंतर पवारांनी आवाज काढला. त्यानंतर अजित पवारांना तीन, चार महिने ऐकू येत नव्हते. हे अजित पवारांना ऐकू आले नाही. लॉकडाऊननंतर कान साफ झाले, त्यामुळे अजित पवारांना गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला.

अधिक वाचा  'चंद्रकांतदादा फडणवीस आणि राज ठाकरेंचे तरी ऐका; वक्तव्य मागे घ्या!' - पाटील

सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे : राज ठाकरे

अजित पवारांच्या घरी रेड पडली, पण सुप्रिया सुळेंच्या घरी नाही. एकाच घरात राहून रेड टाळणं सुप्रिया सुळेंनाा कसं जमलं? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. सुप्रियांचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका राज ठाकरेंनी केली आहे.

Sanjay Raut यांची प्रॉपर्टी जप्त केली तर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिव्या दिल्या : राज ठाकरे

पत्रकार परिषदेत एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक अतिशय खालच्या दर्जेची भाषा वापरतो. यांची प्रॉपर्टी जप्त केली तर त्यांनी पत्रकार परिषद घेत शिव्या दिल्या. नाव न घेता राज ठाकरेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

राज ठाकरे नाही तर शरद पवारांनी भूमिका बदलली : राज ठाकरे

देशाला परदेशी पंतप्रधान चालणार नाही, ही बोलणारी बाळासाहेब ठाकरे ही पहिली व्यक्ती. त्यानंतर हा धागा पकडत शरद पवार पक्षातून बाहेर पडले. निवडणुकानंतर पुन्हा दोन महिन्याात भूमिका बदलली आणि कृषीमंत्री झाले. राज ठाकरेंनी नाही तर शरद पवारांनी त्यांची भूमिका बदलली.

अधिक वाचा  अनिल परबानंतर सोमय्यांचा ठाकरे परिवाराकडे मोर्चा, दिला इशारा

राज्यातील सर्व मशिदीवरचे 3 मे पर्यंत भोंगे उतरवा : राज ठाकरे

 मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलीही तेढ निर्माण करायची नाही.

 देशात समान नागरी कायदा आणा : राज ठाकरे

 देशात समान नागरी कायदा आणा. देशातील लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल, असा कायदा असे नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे. या गोष्टी देशात होणे आवश्यक आहे. लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे

जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले : राज ठाकरे

भुजबळांना त्यांच्या संस्थेतल्या गैरव्यवहारामुळे आत जावं लागलं. दोन अडीच वर्षे जेल मध्ये गेल्यानंतर शपथ घेणारा पहिला नेता. जेलमध्ये जाऊन आल्यावरही भुजबळ मंत्री झाले