मुंबई- झी मराठीवरील लोकप्रिय शोपैकी होम मिनिस्टर हा एक शो आहे. सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजे आदेश बांदेकर हा शो होस्ट करताना दिसतात. गेल्या 18 वर्षापासून होम मिनिस्टर सुरू आहे. आदेश बांदेकर वहिनींना मानाची पैठणी देऊन सन्मान करत आहेत. आता गृहिणींना 11 लाखांची पैठणी मिळवण्याची संधी या शोच्या माध्यमातून मिळणार आहे. आज 11 एप्रिल पासून होम मिनिस्टर हा शो ‘महामिनिस्टर’ या पर्वात बदलला आहे. सर्वांना 11 लाखांची पैठणी कशी असणार याची उत्सुकता होती. आज याची पहिली झलक समोर आली आहे.

झी मराठीनं नुकताचं एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये 11 लाखाच्या पैठणीची पहिली झलक समोर आलेली आहे. महामिनिस्टरच्या 11 लाखाच्या पैठणीची गृहीणींमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली होती, ही अतुरता संपली आहे. याचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

अधिक वाचा  महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीची तारीख ठरली; OBC आरक्षणाशिवाय सोडती होणारं

सोन्याची जर आणि हिऱ्यांनी जडलेली अशी प्रत्येक महिलेच्या मनात भरावी अशीच ही पैठणी आहे. आता ही पैठणी कोणाला मिळणार याची देखील उत्सुकता आहे. झी मराठीनं 11 लाखांच्या पैठणीची पहिली झलक शेअर करत म्हटलं आहे की, पदरावरती जरतारीचा मोर नाचरा असणार… संसारातून वेळ काढून खेळ नवा रंगणार….होम मिनिस्टरचे नवे पर्व ‘महामिनिस्टर’…

https://www.instagram.com/_u/zeemarathiofficial/?utm_source=ig_embed&ig_rid=de015b6e-9b46-41e3-981e-f497c589e0ef&ig_mid=9E09F117-C5E7-443E-BFC5-84C0DAACE5ED प्रत्येक महिलेला वाटतं असतं की, आपल्याला एक तरी पैठणी असावी म्हणून..अनेक जणींची हीच इच्छा या कार्यक्रमातून पूर्ण झाली आहे.

आता या कार्यक्रमामुळे 11 लाखांची पैठणी महिलांना मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे.सध्या सोशल मीडियावर देखील झी मराठीकडून या 11 लाखाच्या पैठणीचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. मात्र काहींनी ही 11 लाखाच्या पैठणी देण्यासा विरोध देखील दर्शवला आहे. नेटकऱ्यांनी ‘महामिनिस्टर’ सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं होतं.