भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यांना 50 हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

अधिक वाचा  संभाजीराजेंची पुरती कोंडी?; राजेंच्या हाती केवळ काही तासचं?