पूणे: पुणे लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे याच्यासह तिघांवर 15 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी धडक कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍यावर अ‍ॅन्टी करप्शनची कारवाई झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखडे आणि इतर दोघांवर अँटी करप्शन यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची इतर दोघां विरुद्ध लाच प्रकरणी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे पंधरा हजार रुपयांच्या लाच प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  आईनेच नवजात अर्भकास शौचालयाच्या भांड्यात कोंबलं, पुणे पोलिसांमुळे वाचले तान्हुल्याचे प्राण