गेले दोन महिने चांदणी चौक परिसरातील वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी आज पुणे महानगरपालिकेचे स्थानिक नगरसेवक दिलीप वेडेपाटील व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त मा. आनंद भोईटे नव्याने तयार होणाऱ्या उड्डाणपुलाचा काही भाग खुला करण्यासाठी व वाहतूक शिस्तीत मार्गक्रमण होण्यासाठी पाहणी करण्यात आली. सध्या बाह्यवळण मार्गावर ती चांदणी चौकात रस्त्याच्या मोठ्या प्रमाणात खोदाई चालू असल्याने वाहनचालकांना दिवसेंदिवस होणारे त्रास मध्ये वाढ होत असल्याने या भागात वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त पोलिस कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने वाहतूक नियमनाचे फलक लावण्यासाठी हा संबंधित दौरा आयोजित करण्यात आला होता.

अधिक वाचा  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर? आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नियोजन सुरू

पुणे मनपा प्रभाग 10 मधील चांदणी चौक येथे होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा याकरिता नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांनी परिमंडळ क्र.२ वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त मा. आनंद भोईटे साहेब यांच्या समवेत चांदणी चौक व बावधन परिसरातील रस्त्यांची पाहणी केली.

तसेच काही दिवसांपासून बावधन परिसरात वाहतूक विभागाने वाहनांच्या होत असणाऱ्या पार्किंगवर दंडात्मक कारवाई देखील सुरू केली आहे परंतू या परिसरात नो पार्किंग , पी-1,पी-2, समांतर पार्किंग इ. सर्व प्रकारचे फलक लावून झाल्यावर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई करावी व पुढील काही दिवस अस्ताव्यस्त लागत असलेल्या वाहनांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तातून नागरिकांमध्ये पार्किंग बाबत जागरूकता निर्माण करावी अशी मागणी देखील नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या माध्यमातून पोलिस उपायुक्त मा.आनंद भोईटे यांना करण्यात आली आहे.

अधिक वाचा  बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास गरजेचा - चंद्रकांत पाटील

पुणे मनपाच्या वतीने सर्व प्रकारचे फलक लावून झाल्यावर पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त मा.भोईटे यांनी यावेळी कबुल केले आहे परंतु जर दुहेेरी पार्किंग झाल्याचे निदर्शनास आले तर संबधित वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील उपायुक्त मा. भोईटे यांनी यावेळी सांगितले.