रिहे : जवळ पिंपोळी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. संस्थेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी जवळ, पिंपोळी, केमसे वाडी, गवारेवाडी, शेळकेवाडी, रसाळवाडी येथील ग्रामस्थांनी एक मताने नवीन संचालकांना संधी दिली व संस्था बिनविरोध निवडून आणली.

चेअरमन म्हणून विशेष घटकातील उमेदवार यशवंत सुपेकर यांना व व्हाईस चेअरमन म्हणून मागास वर्गातील उमेदवार अशोक शिंदे यांना संधी दिली आहे. संचालक म्हणून बाळासाहेब शिंदे, जयसिंग घारे, राजेंद्र शेळके, मोहन घारे, भरत केमसे, विलास केमसे, संजय खानेकर, प्रकाश गवारे तसेच महिला प्रतिनिधी म्हणून शोभा घारे व सुनीता घारे यांना संधी देण्यात आली.

अधिक वाचा  रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

संस्था बिनविरोध होण्यासाठी ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले व त्यांच्या या प्रयत्नांना यश आले.