पालकमंत्री असताना आपण कोल्हापूरसाठी काय केले? असा सवाल विरोधक विचारतात.

चंद्रकांत पाटील: मी पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी अनेक गोष्टी झाल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूरकरांच्या डोक्यावरील टोलचे ओझे घालवले. भाजप सरकारने ‘आयआरबी’ला एक रकमी ४७३ कोटी देऊन शहर टोलमुक्त केले. मी महसूल मंत्री असताना तीर्क्षक्षेत्र विकास आराखड्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर करून दिला. तर कन्यागत पर्वसाठी नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र विकासासाठी सुमारे १२१ कोटी रुपये दिले. त्यातून अनेक विकासकामे झाली. विमानतळ विस्तारीकरणासाठी केंद्रातील भाजप सरकारने २७३ कोटींचा निधी दिला. त्यातील ८० कोटी रुपये राज्य सरकारने दिले होते. शहर सुशोभीकरणासाठीही निधी उपब्ध करून दिला. ‘आडवाटेचे कोल्हापूर’ अशा उपक्रमातून पर्यटनाला चालना दिली. जोतिबा देवस्थानची विकासकामेही झाली. शहरात लोकसहभागातून ५ रुपयांत चपाती-भाजी यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले. दुर्ग महोत्सवाचे आयोजन केले. भाजप काळात जेवढा निधी आला, त्यातील अर्धा देखील निधी महाविकास आघाडीच्या काळात आला नाही.

अधिक वाचा  गुजरात टायटन्सची फायनलमध्ये दमदार एन्ट्री; राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय

प्रश्न : भाजप जातीयवादी पक्ष असून, तो कोल्हापूरला धार्जिण नाही, असे विरोधक म्हणतात?

चंद्रकांत पाटील ः वर्षानुवर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा आरक्षण दिले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी आरक्षण दिले आणि न्यायालयात टिकवून दाखवले. महाविकास आघाडी सत्तेत येताच त्यांनी मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर स्थगिती आली. आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला भाजपने ५०० कोटींचा निधी दिला. महाविकास आघाडी सरकारने या मंडळाच्या सवलती, योजना बंद पाडल्या. ओबीसी आरक्षणही या सरकारने घालवले. मराठा समाजाचे भले व्हावे, अशी महाविकास आघाडीची इच्छा नाही. ते खऱ्या अर्थाने जातीयवादी आहेत. उत्तर विधानसभा मतदारसंघाने नेहमीच हिंदुत्वाला कौल दिला आहे. आताही विजय आमचाच आहे.

प्रश्न ः भाजपला मतदार कोणत्या मुद्यांवर मतदान करतील?

अधिक वाचा  संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत म्हणून राज्यसभेत; संभाजीराजे यांची मागणी अखेर मान्य

चंद्रकांत पाटील ः महाविकास आघाडीचा कारभार जनतेसमोर आहे. दोन मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. तिसरे तुरुंगात आहेत; पण अद्याप राजीनामा दिलेला नाही. काही मंत्र्यांवर गंभीर आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे. नातेवाईकांवर कारवाई झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या भोवतीही संशयाचे धुके आहेत. राज्य सरकार म्हणजे वसुली सरकार झाले आहे. परीक्षा रद्द, पेपर फुटले, वीज बिलाचा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी नाहीच, महिला सुरक्षा नाही. अडीच वर्षात विकासाचे धोरण नाही. या सरकारच्या काळात कोणताच घटक समाधानी नाही. कोल्हापुरात पाणी, रस्ते, पार्किंग, हद्दवाढ, थेट पाईपलाईन हे सगळे प्रश्‍न रखडले आहेत. त्यामुळे मतदार आपला रोष व्यक्त करतील. सत्यजित कदम हे जनमानसातील उमेदवार आहेत. त्यांच्या विजयाची खात्री आहे.

प्रश्न ः भाजपला शिवसेनेचा पारंपरिक मतदार मतदान करणार का?

चंद्रकांत पाटील : सत्तेत असूनही शिवसैनिकाच्या वाट्याला निराशाच आहे. सत्तेसाठी शिवसेनेचे मंत्री गंभीर गुन्हे असलेल्या नवाब मलिकांच्या पाठीशी उभे राहतात. हे सर्व शिवसेनेचा मतदार पाहात आहे. ज्यांच्या विरोधात संघर्ष केला, त्या काँग्रेसचा प्रचार करण्याची वेळ शिवसैनिकांवर त्यांच्या नेत्यांनी आणली आहे. शिवसैनिक आणि त्यांना मानणारा हिंदुत्त्ववादी मतदार हा तत्त्‍वाशी तडजोड करणारा नाही. हा मतदार भाजपलाच मतदान करेल.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्‍न कसा सोडविणार?

चंद्रकांत पाटील : देशातील नद्या स्वच्छ व्हाव्यात आणि त्यांच्या नैसर्गिक रूपात प्रवाही राहाव्यात, यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. या अंतर्गत देशातील अनेक नद्यांची स्वच्छता सुरू आहे. या मंत्रालयातर्फे पंचगंगा नदीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचा नक्की प्रयत्न करू. पूरनियंत्रण या विषयात सत्यजित कदम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रस्ताव दिला असून, त्याची कार्यवाही सुरू झाली आहे.