राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज शनिवार दिनांक 9 एप्रिल2022 रोजी सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कोथरूड विधानसभा मतदार संघाच्या वतीने कर्वेनगर येथे माजी नगरसेवक कै नानासाहेब बराटे उड्डाणपुलाच्या जवळ तीव्र आंदोलन करण्यात आले या आंदोलनात देवेंद्र फडणवीस व गुणवंत सदावर्ते यांना जोडा मारो आंदोलन त्याचप्रमाणे दारू चा अभिषेक करण्यात आला.

 या आंदोलनात नगरसेविका सौ लक्ष्मी ताई दुधाने पुणे शहराचे उपाध्यक्ष स्वप्निल दुधाने व आनंद उर्फ बंडू तांबे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड विधानसभेचे युवक अध्यक्ष गिरीश गुरुनाणी शहर उपाध्यक्ष कुमार शेठ बराटे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे कोथरुड विभागाचे उपाध्यक्ष संतोष बराटे ,शहर सरचिटणीस तानाजी शिंदे ,कर्वेनगर चे अध्यक्ष किशोर शेडगे युवक विभागाचे शहर सरचिटणीस स्वप्निल तांबे, कोथरुड विभागाचे युवक कार्याध्यक्ष मोहित बराटे, ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव राजगुरू, महिला विभागाच्या अध्यक्ष ज्योती सूर्यवंशी, मीनाताई मोरे, उर्मिला गायकवाड ,नंदीनि पानेकर, मंदाकिनी वनसाळे, पल्लवी शेडगे,वेणूताई शिंदे,अर्चना चंदनशिवे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

अधिक वाचा  बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास गरजेचा - चंद्रकांत पाटील