२ एप्रिल दिवशी मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत पार पडला. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आलं होतं. मुस्लिमांनी मशिदीवर भोंगे लावले तर त्याच्यासमोर मोठ्या आवाजात आपण हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. यानंतर राज ठाकरेंवर अनेक स्तरातून टिका झाली. तसेच पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी देखील राज ठाकरेंच्या या विधानाचा विरोध केला होता. या कारणावरून राज ठाकरेंनी वसंत मोरेंची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी आता आता साईनाथ बाबर हे मनसेचे पुण्याचे शहराध्यक्ष असतील.

याच पार्श्वभूमीवपर वसंत मोरे मनसेला रामराम ठोकणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. तसेच मला शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याचे स्वत: वसंत मोरेंनी सांगितले आहे.

अधिक वाचा  अखेर राज गर्जना होणार, २१ मे रोजी पुण्यात जाहीर सभा

यासोबत वसंत मोरेंना अजित पवार आणि उध्दव ठाकरे यांनी देखील निरोप पाठवला असल्याची माहिती समोर येत आहे. “वसंत कधी काही करणार असला तर माझी आठवण ठेव.” असा निरोप अजित पवारांनी पाठवला आहे, तर आमच्याकडे तुमचं स्वागत आहे, असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देखील दिला आहे. यामुळे वसंत मोरे आता कोणत्या पक्षाची वाट धरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.