मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचारी निषेध नोंदवण्यासाठी आले. त्यांच्या या आंदोलनाची चाहूल लागताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही येथे धाव घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेश माजी पदाधिकारी नरेंद्र राणे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष बबन कनावजे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सिल्वर ओक गाठले. मात्र, त्यांना पोलिसांनी मध्येच थोपवले.

एसटी कर्मचाऱ्यांनी आधी अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी येऊन चर्चा करायला हवी होती. मात्र, आज त्यांनी जे केलंय त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया संतप्त झालेलया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी नरेंद्र राणे, बबन कनवजे यांनी ‘हे सगळे भाजपचे कारस्थान आहे. या आंदोलनास फडणवीस कारणीभूत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानात संधी दिली होती. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊन चर्चा करायला हवी होती.

अधिक वाचा  टेक्सास गोळीबार प्रकरण; प्रियांका चोप्रा शोक व्यक्त करत म्हणाली...

मात्र, कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन भरकटवले गेले. शरद पवार यांची प्रतिमा बिघडविण्यासाठीच हे कारस्थान केले जात आहे. यामागे भाजप, देवेंद्र फडणवीस आणि सदानंद गुणवर्ते हे जबाबदार आहेत. जर.. गुणवर्ते खाली दिसला तर त्यांना सोडणार नाही असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय.