शिवसेना नेते यशवंत जाधव सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. अशातच आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेतील शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. त्यात भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्यानं काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते.

अधिक वाचा  इराणवर प्रतिहल्ला करण्याआधी इस्रायलची भारताला खास चिठ्ठी, काय म्हटलय त्या चिठ्ठीत?

आयकर विभागाचा अहवाल काय म्हणतो? 

शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आयकर विभागाने जाधव यांच्या घरावर छापा मारला होता. या छाप्याचा अहवाल ‘माध्यमां’च्या हाती लागला आहे. त्यात आयकर विभागाने कोट्यवधींच्या उलाढालीचा उलगडा केला आहे.

कसा झाला घोटाळा? 

शेल कंपनींच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल करत कॅश पैसा या कंपनींना देण्यात आले आणि या कंपनीच्या माध्यमातून लिगल एन्ट्री स्वःताच्या आणि आपल्या निकटवर्तीयांच्या नावावर घेण्यात आल्या, लोनच्या स्वरुपात परिवारातील इतर सदस्यांना पैसे या शेल कंपनीकडून देण्यात आले. एकूण 15 कोटी रुपये यशवंत जाधव यांनी प्रधान डिलर्स यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांमधून कर्ज म्हणून घेतले. आयकर विभागाच्या अहवालानुसार, उदय शंकर महावर या व्यक्तीकडून 2019-20 मध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव आणि इतर सदस्यांना 15 कोटी दिले गेले. ही 15 कोटींची रोख रक्कम यशवंत जाधव यांनी उदय शंकर महावर यांना दिले आणि नंतर उदय शंकर यांच्या कंपनीकडून आपल्या खात्यांमध्ये लीगल एंट्री करुन घेतले. यातील 15 कोटी पैकी 1 कोटी यामिनी जाधव यांनी कर्ज घेतलं आणि ते निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं.

अधिक वाचा  MIM भाजपची ‘B टीम’ अन् पुण्यात उमेदवारीही पराभूत मानसिकतेचे षडयंत्र! पण जनता सुज्ञ झालीय: काँग्रेस

शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीशिवाय आणखी दोन नावं

शिवसेनेचे नेते आणि माजी बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या डायरीची चर्चा राज्यात जोरदार सुरु आहे. आयकर विभागाच्या धाडीमध्ये मिळालेल्या यशवंत जाधव यांच्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ शिवाय अन्य दोघांची नावे आहेत. त्यातील एकाचा उल्लेख केबलमॅन असून दुसरी व्यक्ती महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यशवंत जाधव यांच्यासोबत आता इतरांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

यशवंत जाधव यांच्या डायरीत 2 कोटी रुपये आणि 50 लाखांच मातोश्रीला दिल्याचा उल्लेख होता मात्र आणखी दोन नावांचाही उल्लेख असल्याची माहिती आता समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या डायरीत शिवसेनेच्या आणखी दोन नेत्यांची नावं आहेत. त्यातील एकजण मंत्रीपदावर आहेत तर दुसऱ्या महिला नेत्या आहेत. या महिला नेत्या मुंबई महापालिकेत चर्चेत असतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.