गोव्याचे मुख्यमंत्री माननीय डॉक्टर प्रमोद सावंत यांचा मराठा सेवा संघ पुणे च्या वतीने गोवा येथे भेट घेऊन त्यांचा जिजाऊंचे तैलचित्र, शिंदेशाही पगडी, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप -वाघनखे व कवड्यांची माळ असे स्मृतिचिन्ह आणी जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावरची पुस्तके भेट देऊन माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचा सन्मान करण्यात आला.

मराठा सेवा संघ पुणे शहराच्या वतीने केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्रजी कुंजीर ,पुणे शहराध्यक्ष शिवश्री सचिन आडेकर ,शिवश्री संभाजी उर्फ आबा जगताप यांचे हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा  नवनीत राणा प्रकरणात महाराष्ट्रातील ४ बड्या अधिकाऱ्यांना संसद भवनात हजर राहण्याचे आदेश

यावेळी मा मुख्यमंत्री यांना सामाजिक मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवरायांचे इतिहासातील कतृत्वावर आधारित शिवसृष्टी गोवा येथे निर्माण करणेत येईल असे मा प्रमोद सावंत यांनी आश्वस्त केले. त्याच प्रमाणे गोवा येथील किल्लेंचे संवर्धन पी पी पी तत्वावर करणेत येईल असे सांगितले.