महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोथरूड उपविभाग अध्यक्ष गणेश शिंदे यांच्या वतीने कोथरूड मधील प्रभाग क्रमांक ३० मधील रिक्षा चालक तथा प्रवासी वाहतूक कार चालक यांच्या करिता मोफत एक लाख रुपयांचा विमा काढून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

अनेक रिक्षावाले काका प्रवाशांची मनापासून काळजी घेतात अशा रिक्षावाल्याची आपण काळजी घेतली पाहिजे या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आल्याचे गणेश शिंदे यांनी सांगितले. रामबाग कॉलनी परिसरातील ज्येष्ठ नागरिक देशपांडे काका, अजित कदम, राजू खोडके त्याचबरोबर संतोष सणस यांच्या हस्ते सुमारे १५० रिक्षा चालक आणि कार चालकांना विम्याचे कागद पत्र देण्यात आले.

अधिक वाचा  बृजभूषण सिंह यांना रोखा,राज ठाकरे ५ तारखेला अयोध्येत येणारच, कांचनगिरींचं पंतप्रधान मोदी यांना पत्र