राजस्थान- सोशल मीडियामुळे आपल्या अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आपण आपल्या घरी बसून सोशल मीडियाद्वारे जगभरातील अनेक घडामोडी एका क्लिकवर जाणून घेऊ शकतो. एखाद्या ठिकाणी मोठी आग लागली असो किंवा एखाद्या दुकानावर दरोडा पडला असो, गॅसचा स्फोट होऊन काही जणांचा मृत्यू झाला अशा अनेक घटना आपण रोज पाहत असतो. तसेच या घटना घडल्यानंतर लगेच आपल्याला ही बातमी सोशल मीडियाद्वारे काही सेकंदात समजते.

दरम्यान, आत्ताही असाच एक फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. हा फोटो थोडासा मन हेलावणारा आहे परंतु या घटनेतील पोलीस कॉन्स्टेबलची कामगिरी कौतुकास्पद आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या पोलीस कॉन्स्टेबलने एका जळत्या दुकानातून एका चिमुरड्याचा जीव वाचवला आहे. राजस्थानच्या करौलीमध्ये हि घटना घडली असून सोशल मीडियावर सध्या याच घटनेची चर्चा सुरु आहे.

अधिक वाचा  वयाच्या 54 व्या वर्षी 'या' बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ

नेमकं कशामुळे हि आग लागली असावी? याबाबत विचारपूस केली असता हि माहिती समोर आली. राजस्थानच्या करौलीभागात हिंदू संघटनांनी नव संवत्सरच्या निमित्ताने बाईक रॅली काढली होती. हि बाईक रॅली अनेक भागातून निघाली होती. त्यानंतर हि रॅली मुस्लीमबहुल भागातून जात असताना या बाईकवर काही माथेफिरू समाजकंठकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली.

हे समाजकंठक एवढ्यावरच थांबले नाही तर त्या ठिकाणी दगडफेक करून जाळपोळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे प्रकरण वाढले असून यामध्ये अनेकांचे भलेमोठे नुकसान झाले. तसेच अनेक सामान्य नागरिकांना याची मोठी किंमत मोजावी लागली. मात्र यावेळी एका पोलीस कॉन्स्टेबलने हिरोसारखी एंट्री घेऊन अनेकांचा जीव वाचवला.

अधिक वाचा  बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास गरजेचा - चंद्रकांत पाटील

हा धक्कादायक प्रकार घडत असतांना एका दुकानाला भलीमोठी आग लागली होती. त्या दुकानात दोन महिला व त्यांच्यासोबत एक लहान बाळ होते. ते आपला जीव वाचवण्यासाठी त्या दुकानात होते मात्र त्या दुकानालाच आग लागल्याने त्या दोन महिला आणि ते बाळ सगळेच घाबरले होते. या परिस्थिती सामान्य नागरिकांना वाचवायचे सोडून ते समाजकंठक एकमेकांचा जीव घेण्यात व्यस्त होते. यावेळी त्या कॉन्स्टेबलची नजर त्या चिमुरड्यावर पडली.

त्यानंतर त्या कॉन्स्टेबलने स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्या भडकलेल्या आगीतून त्या चिमुरड्याचा एका कापडामध्ये गुंडाळले आणि बाहेर उडी घेतली. तसेच त्या दोन महिलांना देखील सुखरूप बाहेर काढले. त्या चिमुरड्याला कॉन्स्टेबलने घट्ट छातीशी धरले आणि सुरक्षित ठिकाणी धाव घेतली यावेळी कोणीतरी त्यांचा फोटो काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

अधिक वाचा  एका जागेची काँग्रेस यादी वाढतच चाललीय! राज्यसभेत कोण जाणार

नेत्रेश शर्मा असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. हा फोटो सोशल मीडियावर हवेसारखा पसरला आणि त्यानंतर सर्व स्तरातून नेत्रेश शर्मा यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. एवढेच नाही तर ही बातमी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः नेत्रेश शर्मा यांना फोन करून त्यांचे कौतुक केले. एवढेच नाही तर नेत्रेश शर्मा यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना हेड कॉन्स्टेबल पदावर बढती दिली आहे.