मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल मीडियावरील एका पोस्टवरून खमंग चर्चा रंगली आहे. सईने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे. सईने खास व्यक्तीचा फोटो पोस्ट करत रोमॅन्टिक अंदाजात कॅप्शन दिली आहे. ‘दौलतराव सापडला’, असं सईने फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

सई ताम्हणकरने निर्माता अनिश जोगचा फोटो शेअर केला आहे. व्हिडीओ कॉल दरम्यान घेतलेला स्क्रिनशॉट इन्स्टावर पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करताना सईने म्हटलं आहे की, “मी तुला कसं लाजायला भाग पाडते नं..!” त्यानंतर सईने एक साहेब दौलतराव सापडला, असंही म्हटलं आहे.

अधिक वाचा  नवाब मलिक डी गँग प्रकरण : “…त्यामुळे फडणवीस हेसुद्धा तितकेच अपराधी आहेत”

सईनं निर्माता अनिश जोगचा फोटो शेअर करत दौलतराव सापडल्याचं सांगितल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बऱ्याच वर्षांनंतर सई ताम्हणकरने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अनिश जोगनेही सईसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘मॅजिक, तू आणि मी ‘, असं त्याने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. त्याच्या या फोटोवर अभिनेत्री प्रिया बापटने कमेंट केली आहे. ‘क्या बात है, फायनली’ अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रियाने दिली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरनं २०१३ मध्ये निर्माता अमेय गोसावीसोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फार काळ चालला नाही. दोन-तीन वर्षातच दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये दोघे घटस्फोट घेऊन विभक्त झाले होते. आता सईने निर्माता अनिश जोगसोबतचा फोटो शेअर करत दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुलीच दिली आहे.