मुंबई – प्रसिद्ध साऊथ सुपरस्टार  यशचा  ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF Chapter 2’ 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त  आणि रवीना टंडन  यांच्यासह साऊथ अभिनेत्री श्रीनिधी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात संजय दत्त एका जबरदस्त अंदाजात दिसणार आहे. संजय जी भितीदायक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे ती काल्पनिक नसून सत्य कथेवर आधारित आहे. या सोन्याच्या खाणीची सत्य कथा ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या कथेवरच हा चित्रपट बनविण्यात आला आहे. सोन्याच्या हव्यासापोटी केजीएफच्या परिसरात रक्तपात आणि प्रगतीही पाहायला मिळाली. जाणून घ्या काय आहे सत्य.

अधिक वाचा  ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालयाकडे वर्ग- सुप्रीम कोर्ट

प्रसिद्ध साऊथ चित्रपट KGF ची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की पहिल्या भागानंतर लोक सिक्वेलची मागणी करू लागले होते. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. ज्या सोन्याच्या खाणीवर चित्रपट बनला आहे त्याचा इतिहास सुमारे 121 वर्षांचा आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, प्रत्यक्षात KGF म्हणजेच ‘कोलार गोल्ड फिल्ड्स’ची कथा रक्तरंजित आहे. जिथे सोन्याचा साठा असेल तिथली कथा रक्तरंजित असेल. सोन्याने समृद्ध असलेल्या या भागात अनेक धक्कादायक गोष्टी ऐकायला मिळतात.

डीएनएच्या रिपोर्टनुसार 121 वर्षांपूर्वी केजीएफमध्ये उत्खननादरम्यान 900 टन सोने सापडले होते. कर्नाटकात हे कोलार गोल्ड फील्ड आहे. या खाणीबद्दल ब्रिटिश सरकारचे लेफ्टनंट जॉन वॉरन यांनी एक लेख लिहिला होता. त्यानुसार 1799मध्ये श्रीरंगपट्टणाच्या लढाईत टिपू सुलतानचा वध करून कोलार आणि आजूबाजूचा परिसर ब्रिटिशांनी ताब्यात घेतला होता. काही वर्षांनंतर, ब्रिटिशांनी ही जमीन म्हैसूर राज्याला दिली होती. परंतु कोलार हा सोन्याचा प्रदेश त्यांच्याकडे ठेवला होता.

अधिक वाचा  किल्ले सिंहगड वाहतुक बंद; राजे शिवराय प्रतिष्ठानचे आंदोलन

वॉरनच्या या लेखानुसार चोल साम्राज्याच्या काळात लोक हाताने जमीन उकरून सोने काढायचे. एकदा वॉरनने गावकऱ्यांना आमिष दाखवून सोने बाहेर काढण्यासाठी खोदकाम करण्यास भाग पाडलं, तेव्हा मातीच्या ढिगाऱ्यातून सोन्याचे काही कणच हाती लागले. त्यामुळे नंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट अनेक मजुरांना जीव गमवावा लागला. कंटाळून ब्रिटिश सरकारने उत्खननावर बंदी घातली. खरं तर सोनं मिळवणं तितकसं सोपं नव्हतं.