मुंबई : सध्या सर्वत्र लाउडस्पीकरवर अजान हा वाद चांगलाचं तापला आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी आंदोलन आणि नारेबाजी सुरू आहे. अशात प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी लाउडस्पीकरवर अजानविषयी वक्तव्य केलं. नुकताचं अनुराधा पौडवाल यांनी ‘झी न्यूज’सोबत बोलताना अजान मुद्द्यावर स्वतःचं मत मांडलं आहे. यावेळी त्यांनी तरुणांना देखील महत्त्वाचा संदेश दिला आहे.

अनुराधा पौडवाल म्हणाल्या, ‘मी अनेक देशांमध्ये फिरले आहे, पण जे भारतात होतं तसं अन्य देशांमध्ये होत नाही. मी कोणत्या धर्माच्या विरोधात नाही. पण भारतात या गोष्टींना मोठ्या प्रमाणात दुजोरा दिला जातो…’

अधिक वाचा  केंद्राचा मोठा निर्णय, १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर घातले निर्बंध

त्या पुढे म्हणाला, ‘मोठ्या आवाजात देशात लाउडस्पीकरवर अजान होतात, तर असं आम्ही का करु नये…. असं अनेकांना वाटतं. जर मुस्लीम देशांमध्ये लाउस्पीकरवर अजान होत नाही, तर आपल्या येथे असं का होतं?’

‘लाउस्पीकरवर अजान केलं तर आम्ही हनुमान चालीसा लावू… ज्यामुळे वाद वाढत आहे. जे अत्यंत वाईट आहे.’ असं मत अनुराधा पौडवाल यांनी मांडलं. शिवाय त्यांनी ‘आपल्याला सर्वांना एकत्र राहायला हवं.’ असा तरुणांना संदेश देखील दिला.