नवी दिल्ली : प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक शंकर महादेवन हा नेहमीच संगीतात हटके प्रयोग करताना दिसला आहे. खरं त्यानं जे काही काम संगीतक्षेत्रात केलं आहे ते उल्लेखनीय आहे. काही वर्षांपूर्वी शंकरनं संगीतात एक अभिनव प्रयोग करत ‘ब्रेथलेस’ ही नवी संकल्पना आणली होती आणि अल्बम रिलीज केला होता. आता त्याच धर्तीवर शंकर महादेवन हनुमान चालीसा गाताना दिसणार आहे. शंकरने याची घोषणा क्रु अॅपच्या माध्यमातून केली आहे. त्याच्या त्या व्हिडीओला शेमारु भक्तीच्या अकाऊंटवरनं शेअर करण्यात आलं आहे.

या व्हिडीओच्या माध्यमातून शंकर म्हणताना दिसतोय की,”त्याला अद्भुत हनुमान चालिसा गाण्याची संधी मिळाली आहे. हे गाणं देखील मी ब्रेथलेस स्टाईलमध्येच गाणार आहे. या गाण्याचा गातानाचा वेग जास्त आहे आणि खूप कठीण आहे. याच व्हिडीओत शंकरने हनुमान चालिसाविषयी आपल्याला काय वाटतं ते विचारही मांडले आहेत. ही अनोखी हनुमान चालिसा शेमारु भक्ती के यु-ट्यूब चॅनलवर दाखवलं जाणार आहे”.

अधिक वाचा  धक्कादायक : पाच महिलांचा भाटघर धरणात बुडून मृत्यू |

शंकर महादेवनचा ब्रेथलेस अल्बम १९९८ मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये त्याच्यासोबत जावेद अख्तर देखील होते. त्यानं या अल्बमचं टायटल ब्रेथलेस पद्धतीत गायलं होतं. ब्रेथलेस गाण्यात न थांबता गायचा गाण्याचा भाग जवळ-जवळ ३ मिनिटाचा होता. सिनेसंगीतात महादेव यांनी खूप वर्ष काम केलं आहे. एहसान आणि लॉय या दोन संगीतकारांसोबत मिळून त्यांनी कितीतरी सिनेमाला हीट संगीत देण्याची धुरा सांभाळली आहे. यामध्ये मिशन काश्मिर,दिल चाहता है.लक्ष्य,बंटी और बबली,डॉन,रॉक ऑन जशा कितीतरी सिनेमांचा समावेश आहे. हनुमान चालिसाविषयी जर बोलायचं झालं तर कितीतरी कलाकारांनी आणि संगीतकारांनी आपल्या पद्धतीनं हनुमान चालिसा रेकॉर्ड केली आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांचादेखील समावेश आहे. या सर्व कलाकारांनी गायलेल्या हनुमान चालिसा खुप लोकप्रिय झाल्या आहेत.