रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १७ एप्रिल २०२२ रोजी चेंबुर येथील ‘आर के हाऊस’ मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी आता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली आहे. मोजक्याच आप्तेष्टांच्या अन् मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हे लग्न पार पडणार आहे असं म्हटलं जात असताना आता सुर उमटतोय की रणधीर कपूर पुतण्याच्या लग्नाला जाणार का? काही दिवसांपूर्वी दिवंगत ऋषि कपूर यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शर्माजी नमकीन’च्या स्क्रीनिंग दरम्यान काका रणधीर कपूर यांनी ”वडलांना भेटायचंय,बोलाव त्यांना” असं विचारलं हे सांगताना रणबीरनं रणधीर कपूर यांना स्मृतीभंशाचा आजार झालाय असं मोठं भाष्य केलं होतं.

अधिक वाचा  पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

पण त्यानंतर रणधीर कपूर यांनी यावर स्पष्टिकण देताना,” आपल्याला असा कोणताच आजार झाला नाही,रणधीरला जे वाटतं तो ते बोलतो,यात मी काय करु शकतो”, असं नाराजीच्या सुरात म्हटलं होतं. ‘शर्माजी नमकिन’ हा ऋषि कपूर यांचा शेवटचा सिनेमा आहे. त्यांच्या मृत्यूपश्चात आता तो प्रदर्शित केला गेला आहे. रणधीर कपूर आपल्या पुतण्याच्या बोलण्यावर खूश नाही आहेत अशी चर्चा होती. त्यामुळे आता रणबीरच्या लग्नात काका रणधीर कपूर सहभागी होणार की नाही यावरनं अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार कळालंय की,रणधीर कपूर आपल्या पुतण्याच्या लग्नाला नक्कीच हजेरी लावणार आहेत.

अधिक वाचा  भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

आलियाची आई सोनी राजदानचे वडिल, म्हणजेच आलियाचे आजोबा खूप आजारी असल्याकारणानं दोन्ही कुटुंबाकडून कुणीही लग्नाविषयी कन्फर्म बोलायला तयार नाही. पण आजोबांना आलियाचं लग्न पहायचं आहे म्हणूनंच खरंतर लग्न तातडीनं करायचा निर्णयही घेतल्याचं बोललं जात आहे. आणि बोललं जात आहे की आलियाही करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमाच्या शूटिंगनिमित्तानं मेहेंदीच्या आदल्या दिवशी पर्यंत म्हणजे १२ एप्रिल पर्यंत बिझी आहे. आलिया रणबीर लग्नानंतर लगेचच रीसेप्शन देणार नसून,लग्नात फक्त कुटुंबिय,मित्रपरिवार आणि काही खास लोकांनाच निमंत्रण देण्यात आलंय, जे लग्नसोहळ्यासाठी आहे. बॉलीवूडकरांसाठी आलिया-रणबीर या महिन्याच्या शेवटी रीसेप्शन देणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.