पुणे: पुण्यातून एक धक्कादायक बातमी येत आहे. पुण्यात किडनी तस्करीचा प्रकार समोर आला आहे. किडनी काढून फसवणूक केल्याचा आरोप एका महिलेने केलाय. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं आमिष दाखवून किडनी काढून घेतली मात्र पैसेच दिले नाहीत, असा आरोप किडनी दान केलेल्या महिलेने एका दलालाविरोधात केला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी याबाबत तपास केल्यानंतर हा प्रकार घडल्याचं लक्षात आलंय. तिच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचंही उघड झालं आहे. त्यानंतर रुग्णालयानेही पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

15 लाख रुपयांचं आमिष दाखवून किडनी काढून घेतल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 24 मार्च रोजी पुण्यातील रुग्णालयामध्ये किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली आहे. किडनी दान करणाऱ्या या महिलेनं 29 मार्च रोजी तिचं रुग्णालयात नोंदवलेलं नाव खरं नसल्याचं सांगितलं. या महिलेकडून मग पोलिसांकडे दलालाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेनं रुग्णालयात नोंदवलेल्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर रुग्णालयाकडून सुद्धा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिक वाचा  कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची प्रकृती बिघडली; ७ दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द