हडपसर : हांडेवाडी रोड वरील श्री राम चौकात श्री रामाची पूर्णाकृती मूर्ती बसविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी मिळाल्या आहेत.त्यामुळे लवकरच या चौकात श्री रामाची मूर्ती बसविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.

हडपसर हांडेवाडी रोड श्री राम चौकात प्रभू श्री रामांच्या पूर्णाकृती मूर्ती उभारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानगी, सेलेना पार्क पाणी टाकीतून पाणी वितरण आणि महापालिका समाविष्ट गावातील दत्तक गावातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

अधिक वाचा  केंद्राचा मोठा निर्णय, १ जूनपासून साखरेच्या निर्यातीवर घातले निर्बंध

‘शिवसेना पक्षाने दत्तक गाव म्हणून जबाबदारी दिलेल्या तसेच महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या उरुळी देवाची, होळकरवाडी, हांडेवाडी, औताडेवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी येथील विविध विकासकामांसाठी सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीची मागणी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. निधीची तरतूद करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. नवीन टाकीतून पाणी पुरवठा लवकर होण्यासाठी तसेच प्रभू श्रीराम पूर्णाकृती मूर्तीस आवश्यक असणाऱ्या परवानगीसाठी त्यांनी मदत केली आहे.’

त्यावेळी त्यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकारी यांना संपर्क साधून काम करण्याच्या सूचना दिल्या, अशी माहितीही भानगिरे यांनी दिली.