पुणे – तब्बल 2 वर्षांनंतर शहरातील करोनाचे निर्बंध महापालिकेने पूर्णत: मागे घेण्यात आले. त्यामुळे महापालिकेने 1 एप्रिलपासूनच शहरातील मास्क विरोधी कारवाई मागे घेतली आहे.मात्र, मे 2020 ते मार्च 2022 अखेर पुणेकरांनी मास्क न वापरण्यापोटी तब्बल 1 कोटी 33 लाख 18 हजार 500 रुपयांचा दंड महापालिकेच्या तिजोरीत जमा केला आहे.

मागील दोन वर्षांत महापालिकेने जवळपास 26 हजार 657 पुणेकरांवर मास्क न वापरल्याने कारवाई केली आहे. 25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. तर हे कडक लॉकडाऊन 17 मे पर्यंत होते. त्यानंतर काही प्रमाणात टप्प्या टप्प्याने लॉकडाऊन हटविण्यात आले. त्यानंतर शहरात करोनाच्या जवळपास तीन लाटा आल्या. त्यामुळे या दोन वर्षांच्या कालावधीत प्रत्येक लॉकडाऊनमध्ये महापालिकेकडून करोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली.

अधिक वाचा  कंगनाची 'धाकड' गिरी फुस्स..; आठवड्यात फक्त २० तिकीटांतून 4 हजार 420 रुपयांची कमाई