पुणे: मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल- डिझेलच्या दरात वारंवार वाढ होत आहे.गेल्या 14 दिवसांत पेट्रोलचे डिझेलचे दर जवळपास 10 रुपयांनी वाढले आहेत. आजचे शहरातील पेट्रोलचे प्रतिलिटर दर 119.13 रुपये झाले आहेत. तर डिझेलचे प्रतिलिटर दर 101.84 रुपयांवर पोचले आहेत.

शहरात पावर पेट्रोलचे दर 123.63 प्रतिलिटर झाले आहेत. तर सीएनजीचे प्रतिकिलो दर 62.20 वर गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने सामान्यांच्या खिश्यावर ताण पडत आहे.

सोमवारी शहरात पेट्रोल 118.29 तर पावर पेट्रोल 122.79 प्रतिलिटर होते. तर कालचे डिझेलचे दर 101.01 प्रतिलिटर होते. सीएनजीचे दर 62.20 प्रतिकिलो होते.

अधिक वाचा  राजीव गांधी हत्या दोषी 'पेरारिवलन' ची होणार सुटका, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश