भाजप चित्रा वाघ यांच्या सभेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरण आता चांगलच चिघळलं आहे. रविवारी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या असता त्यांच्या सभेवर दगडफेक झाल्याचा आरोप खळबळजनक त्यांनी केला आहे.
शहरातील मुक्त सैनिक वसाहत येथील जाहीर सभेत हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रीतसर फिर्याद नोंदवणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सभा सुरु असताना काहीजणांनी त्यांच्या दगडफेक केली असंही त्या म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी ट्विटर करून याबद्दल माहिती दिली आहे.
त्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी दगडफेकचा प्रकार हा स्टेज मॅनेजचा प्रकार असल्याची जहरी टीका केली होता.तसेच नाशकात वाघांच्या अनेक भानगडी आहेत असा खळबळजनक दावा देखील पालकमंत्री पाटील यांनी केला. ते याबाबत कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलत होते.
तसेच चित्रा वाघ यांच्या प्रचारसभेत झालेल्या दगडफेक प्रकरणाची तातडीने चौकशी करा, अशा सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिल्या असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी दिली. सत्य बाहेर आणावे तसेच भाजपची जी मंडळी कोल्हापुरात प्रचाराला येतील, त्यांना जादा पोलीस बंदोबस्त द्या, असे देखील पोलिसांनी सांगितले असल्याच पाटील यांनी सांगितले.
सतेज पाटील यांच्या वक्तव्यावरून आता चित्रा वाघ चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी थेट आव्हान देताना म्हंटले आहे की, ‘सतेज पाटील यांनी माझ्या नवऱ्याची एक जरी भानगड बाहेर काढले तर मी राजकारण सोडते.’ तसेच सतेज पाटील यांनी माझ्या नवऱ्याला या प्रकरणात ओढायला नको होते. मी तुमच्या बायकोवर बोलत नाही. तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?असे त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, सतेज पाटील यांच्या भानगडीच्या एक, दोन, तीन, चार असे खंड निघतील. मी बोलायला सुरुवात केली तर तुमच्या शंभर भानगडी निघतील, असे म्हणत त्यांनी सतेज पाटील यांना लक्ष केले. दरम्यान, सध्या कोल्हापूर पोट निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे.