मुंबई – अभिनेता विराजस कुलकर्णी  याला पुण्यातील एका रस्त्यावर मध्यरात्री भूत दिसले. हा अनुभव विराजसने त्याच्या इन्स्टा पेजवर शेअर केला आहे.सध्या विराजसचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. विराजसने एक व्हिडिओ इनस्टावर पोस्ट केला आहे. यामध्ये तो सांगताना दिसत आहे की, नाटकाचे काम आटपून मी आणि माझा मित्र बाइकवरून घरी चाललो होतो. मित्र बाइक चालवत होता आणि मी मागे बसलो होतो.
पुण्यातील एका रस्त्यावरून जात असताना मला बाइकच्या वाटेत एक माणूस आल्याचा भास झाला. धोतर, पांढरा शर्ट, पांढरी गांधी टोपी अशा वेशभूषेतील ती व्यक्ती बाइक समोर आल्याचा भास झाल्याने मी चमकलो. पण ती व्यक्ती काही क्षणात दिसेनाशी झाली.

अधिक वाचा  राष्ट्रवादीतही प्रभाग रचनेची धुसफूस; 'खडकवासला' त विरोधकांसाठी बदल

तोपर्यंत मित्राने बाइकचा ब्रेक करकचून दाबला. मी ही गोष्ट माझ्या मित्राला सांगावी की नको या विचारात असतानाच मित्राने म्हटलेल्या सॉरी या शब्दाने भानावर आलो. मला तो मित्र म्हणाला, की सॉरी रे असा ब्रेक लावल्याबद्दल. पण मला एक पांढरे धोतर, शर्ट आणि टोपी घातलेले आजोबा गाडीसमोर आल्याचे दिसले.

त्यामुळे मला अचानक ब्रेक लावावा लागला, पण ते कुठे गायब झाले हे कळलेच नाही. आता हा भास असेल की खरच कुणी व्यक्ती आली आणि गेली ते कळलेच नाही. मित्राचे ते बोलणे ऐकून मी चांगलाच घामेघूम झालो. इथे कुठेही न थांबता गाडी चालव असं मित्राला म्हणत आम्ही आपापल्या घरी पोहोचलो.

अधिक वाचा  ...तर हात तोडून हातात देईन, सुप्रिया सुळे भडकल्या