मुंबई – बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजे आरआरआर चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटातील गाणे , तगडी स्टारकास्ट, भव्यदिव्य सिनेमॅटिक एक्सपिरिअन्स आणि राजमौली यांचे सुरेख दिगदर्शनचे कौतुक सध्या सर्वत्र होत आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता राम चरण याने त्याच्या क्रू मेंबर्ससोबत हा आनंद साजरा केला आहे. त्याने क्रू मेंबर्सना सोन्याची नाणी भेट म्हणून दिली आहेत.

याबाबत राम चरणने सांगितले की,’RRR या चित्रपटाला यशात क्रू मेंबर्सचा मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला मी सलाम करतो, असं म्हणत त्याने ३५ क्रू मेंबर्सना सोन्याची नाणी भेट दिली. नाण्यांची खास गोष्ट म्हणजे एका बाजूला राम चरणचे नाव आहे तर दुसऱ्या बाजूला RRR चे चिन्ह आहे.’

अधिक वाचा  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा दुसरा टीजर जाहीर

दरम्यान, मीडिया सर्वेनुसार या चित्रपटाला १० पैकी ९.२ स्टार्स देण्यात आले असून हा चित्रपट सुपरहिट घोषित केला आहे.RRR या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. चित्रपटाने प्री बुकिंग राइट्सच्या माध्यमातून आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट मुख्यभूमिकेत तर अभिनेता अजय देवगणचा छोटा पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे.