पुणे – पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा युद्ध पातळीवर सुरू करा, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी लोकसभेत केली आहे. वाढते शहरीकरण आणि अन्य जिल्ह्यांमधून होणारे स्थलांतरण यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे.यातून सुटका करण्यासाठी हे काम तातडीने सुरू होणे आवश्‍यक आहे, अशी बापट यांची मागणी आहे.

डीपीआर तातडीने व्हावा
मेट्रोचा पहिला टप्पा पूर्णत्वास येत आहे. महाराष्ट्र मेट्रोने फेज-2 साठी सर्वेक्षण आणि नियोजन सुरू केले आहे, सध्याच्या 33.1 कि.मी. मेट्रो मार्गांचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यातील 82.5 कि.मी. लांबीच्या पहिल्या काही मार्गांचा विस्तार करण्यासाठी अहवाल (डीपीआर) तातडीने करण्याची गरज आहे. हे काम मार्गी लागल्यास प्रकल्पाला गती येईल.

अधिक वाचा  संभाजीराजेंचा शिवबंधनास नकार! `प्लॅन बी` मध्ये ही ३ नावे!

लहान, मध्यम आणि अवजड उद्योगांच्या वाढीमुळे पुण्यात वाहतूक आणि अपघात चिंताजनक दराने वाढत आहेत. त्यामुळे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम जलद सुरू करण्याची गरज आहे, अशी विनंती गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री यांना केली आहे.

संभाव्य 8 मेट्रो मार्ग आणि अंतर (कि.मी.)
वनाज-चांदणी चौक – 1.5
रामवाडी-वाघोली -12
हडपसर-खराडी -5
स्वारगेट ते हडपसर -7
खडकवासला-स्वारगेट-13
एसएनडीटी-वारजे -8
पिंपरी- निगडी -4.41
स्वारगेट-कात्रज- 5.46
या मार्गांचे सर्वेक्षण अहवाल मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत.