मुळशी : श्री भैरवनाथ विद्यालय रिहे येथील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तब्बल वीस वर्षानंतर माजी विद्यार्थी स्नेह मेळावा एसएससी बॅच २००२ यांनी आयोजित केला. यावेळी २००२ चा बॅच मध्ये असणाऱ्या ५१ विद्यार्थ्यांपैकी ३८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये १७ मुली व २१ मुले होती. त्यावेळेस असणारे मुख्याध्यापक श्री.आर्डे सर, श्री वाबळे सर, श्री.कामठे सर, श्री. कापडणे सर, श्री. वाघ सर, श्री. गोगावले सर, श्री गायकवाड सर, श्री.बलकवडे आप्पा तसेच श्रीमती देवकर मॅडम सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.

अधिक वाचा  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेचा दुसरा टीजर जाहीर

त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्वागत , शिक्षकांचे स्वागत, स्वागत पेय, दिपप्रज्वलन, परिचय व भाषण, शिक्षक स्वागत, पीपीटी प्रेझेंटेशन, स्नेहभोजन अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये या बॅच ने केलेल्या अनेक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे चित्रीकरण केले, त्यात कोरोना काळात गरजू लोकांना केलेली मदत, लहान मुलांसाठी योगासने सराव, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या उपक्रमांची माहिती सचिन भोसले व रामदास मिंडे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दिली. तसेच यापुढेही अशा जास्तीत जास्त उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प या बॅच च्या सर्व विद्यार्थ्यांनी केला. शेवटी वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अधिक वाचा  वयाच्या 54 व्या वर्षी 'या' बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.कापडणे सर यांनी केले.यासाठी माजी विद्यार्थी सचिन भोसले, रामदास मिंडे, निवेश बोडके, जनार्दन बोरकर, राहुल केमसे, लक्ष्मण केमसे, ज्ञानेश्वर पालवे, सुजाता पडळघरे, सारिका बोडके, अपर्णा शेलार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच संदीप ओझरकर यांनी सर्व शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.