झी मराठी वाहिनीवर नुकताच फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१  या सोहळा पार पडला. या सोहळ्यास मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ जाधवलाही  पुरस्कार मिळाला. तर सिद्धार्थला मिळालेला पुरस्कार पाहून कुशल बद्रिकेने त्याचे तोंडभरून कौतुक करत त्याच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

फिल्मफेअर अवॉर्ड मराठी २०२१ च्या सोहळ्यादरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधवला ‘धुराळा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. स्मिता जयकर आणि कुशल बद्रिके यांच्या हस्ते सिद्धार्थला हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना सिद्धार्थला आपले अश्रू अनावर झाले. तर सिद्धार्थला पाहून कुशल बद्रिकेने त्याचे कौतुक करत त्याच्यासोबतची एक जुनी आठवण सांगितली.

अधिक वाचा  'वर्षा'वरील मॅरेथॉन बैठक संपली, महापालिका निवडणूकीसह 'या' मुद्द्यांवर चर्चा

कुशलने सांगितले की, स्ट्रगलच्या काळात सिद्धार्थने त्याला मोलाची संधी मिळवून दिली होती. त्याने म्हटले की, ‘एका स्पर्धेत अचानक सिद्धू आला होता. तेव्हा तो छोटं मोठं काम करत होता. तर मी रंगभूमीवर काम करत होतो. सिद्धार्थ जेव्हा तिथे आला तेव्हा मी म्हटलं होतं की, हे साले कमर्शियल आर्टिस्ट येतात आणि बक्षिसे घेऊन जातात. आणि कसं कोण जाणे त्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक सिद्धार्थचा आला आणि प्रथम क्रमांक माझा आला होता’.

त्यावेळी सिद्धार्थने मला नाटकात काम करशील का? असं विचारलं होतं. त्यानंतर माझं ‘राम भरोसे’ नावाचं पहिलं कमर्शियल नाटक आलं. तिथून माझा प्रवास सुरु झाला. आज या रंगमंचावरती सिद्धार्थचा पहिला नंबर आला आणि आज ते सर्कल पूर्ण झालं’, असं मी म्हणेन.

अधिक वाचा  बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातले होते, मी मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार..

कुशलच्या या वाक्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तेव्हा कुशल बद्रिके खूपच भावूक झाला. यावेळी त्याला अश्रू आवरणे कठिण झालेले पाहायला मिळाले. कुशलच्या या कौतुकानंतर सिद्धार्थने म्हटले की, ‘थँक्यू फिल्मफेअर. मला असं वाटतं की, स्वप्न पाहिली की ती पूर्ण होतात. आणि ती पूर्ण होण्यासाठी असे मित्र लागतात’.