मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत छाप पाडणाऱ्या अभिनेता निळू फुलेंचा आज वाढदिवस आहे.त्यांच्या वाढदिवसानिम्मित अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित निळू भाऊच्या आठवणींना उजाळा दिला आहे. परंतु या सगळ्यात अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांची पोस्ट सर्वांत जास्त चर्चेत आली आहे.

निळू भाऊच्या वाढदिवसाचे अवचित साधत प्रसाद ओकने एक खास घोषणा केली आहे. त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने, ‘निळूभाऊ.. आज तुमचा वाढदिवस…!!! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं…अनुभवता आलं… तुमच्याकडून बरंच काही शिकलो… तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन “गुरु” च मानलं… अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अधिक वाचा  ठाकरेंचे दुसरे 'खास' राज्यसभेवर? मातोंडकर अन नार्वेकरांची चर्चा

यानंतर प्रसाद ओकने पुढे म्हणले आहे की, तुमचा आशीर्वाद म्हणूनच कि काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली “गुरुदक्षिणा” असेल…!!! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ…!!! या पोस्टमधून प्रसादने त्याला निळू भाऊंवर जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले आहे.

प्रसादच्या या घोषणेनंतर सर्वांनीच त्याचे अभिनंदन केले आहे. अद्याप प्रसादने जीवनपटाविषयी कोणतीही माहिती समोर आणलेली नाही. फक्त त्याला चित्रपटाचे काम करण्याची संधी मिळाली असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रसाद लवकरच या जीवनपटाचे काम हाती घेणार आहे. हा माहितीपट पाहण्यासाठी सर्वांनीच उत्सुकता दाखवली आहे.

अधिक वाचा  ‘मेट्रोमॅन’ हरपला!: शशिकांत लिमये काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने झालं निधन

सध्या प्रसाद ओकने दिग्दर्शित केलेला ‘चंद्रमुखी’ चित्रपट बहुचर्चेत आला आहे. या चित्रपटातील ‘चंद्रा’ गाण्याला प्रेक्षकांनी तर डोक्यावर घेतले आहे. त्यानंतर आता प्रसाद आणखीन एका बायोपिकचे काम हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. निळू फुलेंनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये तसेच नाटकात काम केले आहे.

खास करुन त्यांनी केलेल्या खलनायकाची भूमिका लोकांना चांगलीच भावली आहे. आपल्या अभिनयातून निळू फुले आजही आपल्या सर्वांच्या मनात जिवंत आहेत. आपल्या काळात निळू फुलेंनी ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘जैत रे जैत’, ‘दोन बायका फजिती ऐका’, ‘वो 7 दिन’, ‘कुली’, ‘मशाल’, ‘सारांश’ असे अनेक चित्रपट गाजविले आहेत.