कीव : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे आता गंभीर परिणाम दिसून येत आहे. या दोन्ही देशातील युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही आहेत. त्यातूनच एक भयंकर बातमी समोर येत आहे. रशियाच्या ताब्यातून मुक्त झालेल्या कीवमध्ये 410 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. बुचा परिसरात सापडलेल्या मृतदेहांची माहिती महापौरांनी दिली आहे. दुसरीकडे, बुचा परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडल्यानंतर युक्रेनने रशियावर बुचामध्ये नरसंहार केल्याचा आरोप केला.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी दावा केला आहे की, रशियन सैन्यानं नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं आहे. शक्य तितक्या युक्रेनियन लोकांना दूर करणं हे रशियन लोकांचे ध्येय आहे. आपण त्यांना थांबवून बाहेर काढले पाहिजे. मी G-7 देशांना रशियावर अधिक कठोर निर्बंध घालण्यासाठी आवाहन करतो, असं दिमित्रो कुलेबा यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

कीवच्या उत्तरेकडील सीमेवर असलेल्या बुचाचे महापौर अनातोली फेडोरुक यांनी मृतदेहांची माहिती दिली. ते म्हणाले की रशियन सैन्याने या शहरावर कब्जा केला आहे.महापौरांनी वृत्तसंस्था रॉयटर्सच्या टीमला मृतदेह दाखवले. एका मृतदेहाचे हात पांढऱ्या कपड्याने बांधून तोंडात गोळ्या घातल्या होत्या. फेडोरुक म्हणाले की, कोणत्याही युद्धात नागरिकांसाठी काही नियम असतात, मात्र रशियन सैनिकांनी जाणूनबुजून नागरिकांची हत्या केली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी होकार दिल्यानंतर रशियन सैनिक युक्रेनमध्ये नागरिकांवर गोळीबार करत असल्याचा दावा फेडोरुक यांनी केला. दुसरीकडे, मॉस्कोमधील रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी बुचामध्ये सापडलेल्या मृतदेहांबद्दल विचारले असता लगेच प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

अधिक वाचा  पुण्यातही मंदिराच्या जागी उभारल्या मशिदी, मनसे नेते अजय शिंदेंचा दावा

दरम्यान क्रेमलिनने नंतर सांगितले की, विशेष लष्करी कारवाईचे उद्दीष्ट नागरिक आणि लोकसंख्या असलेल्या भागांऐवजी युक्रेनियन सैन्य आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करणं होतं. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी युक्रेनचे दावे फेटाळले आणि रशियन सैन्यानं कोणत्याही नागरिकांच्या हत्येच्या आरोपाला नकार दिला.

याआधी एएफपी या वृत्तसंस्थेने बुका शहराच्या महापौरांचा हवाला देऊन सांगितले की, येथे एक सामूहिक कबर सापडली आहे जिथून 280 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. अनातोली फेडोरुक यांनी फोनवर AFFIवृत्तसंस्थेला सांगितलं की बुका येथे एक सामूहिक कबर सापडली आहे, जिथे 280 लोकांचे मृतदेह सापडले आहेत.

अधिक वाचा  भारत अन् दक्षिणपूर्व आशियामध्ये उत्पादन वाढवण्याची Appleचा प्लॅन

त्याच वेळी, युक्रेनने शनिवारी दावा केला की युक्रेनने कीवच्या आजूबाजूचा सर्व भाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. 24 फेब्रुवारीनंतर प्रथमच राजधानी कीववर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे.